किती दूर लोटू या शब्दांना ? तरीही डोळ्यासमोर नाचत राहतील, कानांमध्ये गुणगुणत राहतील, मनामध्ये सलत राहतील...
तेच तर आहेत फक्त मला समजून घेणारे, आणि त्यांनाच दूर लोटून कुठे जाऊ मी ?
सार जग सोडून जाईल पण हे मात्र नेहमी साथ देतील.
सप्तपदी घेऊन एक नात जन्माला येत पण या शब्दांनी तर कधीच कोणती आस धरली नाही.
ते फक्त माझ्या हृदयात येऊन काहूर माजवतात, कशी मी दूर लोटू या शब्दांना ?
किती पराकोटीचे प्रयत्न करू कि ते होतील थोडेशे दूर, श्वास घेतील स्वातंत्र्याचा.
पण, हि प्रिया पुन्हा हरवली तर ? मग, शब्दच शोधून घेऊन येतील या प्रियाला.
प्रिया
No comments:
Post a Comment