एकेकदा वाटत हे मन किती अजब आहे, कितीकाही सामावलं आहे यात, आज आता या क्षणाला ते सुखी असतं आणि पुढच्या काही क्षणात ते हतबल असत...
या मनाला कराव तरी काय?
शांत रहाव तर ते समुद्रात धाव घेत,
समुद्राजवळ उभं राहा तर ते आकाशात झेपावत,
आकाशात जाव तर ते इकडे तिकडे भटकत राहत.
या मनाला कराव तरी काय?
कधी काय टोचेल अन टपकन अश्रू ओघळेल,
तर कधी कड्यावरून पडून पण स्मितहास्य करेल,
बंदिस्त शरीरातून बाहेर येण्याची केविलावणी धडपड नेहमीच करेल,
आणि चितेवर जळणाऱ्या देहाला पाहून टाहो फोडेल.
या मनाला कराव तरी काय?
काय दडलंय यात,
कधी काळ्या तर कधी पांढऱ्या रंगात लपून राहत,
तर कधी लाल रंगाने नाहून निघत,
हळूच चोर पावलांनी आकाशात क्षिताजापर जात,
आणि रंगीबेरंगी इंद्रधनूसारखं साऱ्यांना सुखावत.
या मनाला कराव तरी काय?
माराव ?
ओरडाव?
लाथाडाव?
कि कुरवाळाव??
प्रिया सातपुते....
No comments:
Post a Comment