नदीच्या वाहत्या पाण्यात सगळचं वाहून नेलं जात…पुरूषाच मनही अगदी असंच आहे…तो त्याच्या मित्रांशी भांडेल, अदळाआपट करेल, मारामारी करेल, शिव्या सुद्धा घालेल…पण, दुसऱ्याच क्षणाला तो हे सगळ विसरून नव्या क्षणाला सामोरा जाईल…तो जास्ती भावनिक गुंतागुंतीत पडतच नाही…त्यामुळे अश्रू काय असतात हे त्यांना माहितच नसत…अश्रूंची क्षमता किती भयानक आहे…हे त्यांना कळत पण तेव्हा ते हतबल असतात…याच्या अगदी विरुद्ध स्त्रियांचं असतं…त्या नदीतल्या भोवऱ्या सारख्या असतात…त्या भोवऱ्यात कोणी अडकल कि ती व्यक्ती एक तर गतप्राण होऊन सुटू शकते किंवा…त्या भोवऱ्याच्या स्वाधीन होऊन…ती भांडेल, त्यातला शब्द अन शब्द मनाशी पक्का बांधून ठेवेल…अगदी दोन-तीन वर्षानंतर सुद्धा ती नव्या भांडणात जुन्या गोष्टी उकरून उकरून काढेल…ती ठरली भावनिक, त्यामुळे तिच्या मनावरच आघात होतो…शरीराच्या जखमा भरून निघतील पण, मनाच्या प्रत्येक नव्या भांडणात सोलवटून निघतील…अश्या वेळी मन मोकळ करायचा एकंच मार्ग तिच्याकडे असतो तो म्हणजे…अश्रू…एकदा का ते तिच्या डोळ्यातून बाहेर आले कि ते असंख्य तलवारी बनूनच पुरुषावर हल्ला चढवतात…वेळीच त्याने प्रेमाची ढाल बाहेर काढली नाही…दोघांच्या संसाराची लक्तरे निघाल्याशिवाय राहत नाहीत…
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment