*आजच्या, दिनांक १३ नोव्हेंबर २०१४, महाराष्ट्र टाईम्समध्ये "गाणं मनातलं" सदराखाली प्रकाशित झालेला माझा हा लेखं तुम्हां सर्वांसोबत शेयर करतांना खूप आनंद होत आहे. *
भावनांना जेव्हा जिद्द मिळते, तेव्हा शब्द जन्माला येतात, अन शब्दांना जेव्हा सूर मिळतो, तेव्हा जन्माला येत, "गाणं". प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्या जवळच असं एक गाणं असतच. जे त्यांना भरभरून प्रेम देत तर कधी प्रेरणा! ते कधी हसवत, तर कधी आठवणींच्या वारुळात घेऊन जात. भावनांच्या कल्लोळात ते जगण्याची उभारी देत. आपण एकटे नसून आपल्यासोबत कोणी आपल आहे, याची जाणीव करून देत.

लहानपणी प्रत्येक घासाबरोबर मम्माच्या तोंडून ऐकलेलं हे गाण,
" ये ग गाई गोठ्यामध्ये,
पिल्ल्याला दुध दे वाटीमध्ये,
पिल्ल्याची वाटी मांजर चाटी,
मांजर गेले रागाने,
तिथेच खाल्ले वाघाने,
वाघमामा गुरगुर करतो,
अस्वलमामी पोळ्या करते,
एक पोळी करपली,
पिल्ल्याने आमच्या ती,
दुधासंगे ओरपली,
दुध झाले कडू,
पिल्ल्याला आले रडू…"
आजही हे गाणं माझ्या कानांमध्ये घुमत राहत. अन आईच्या निरपेक्ष प्रेमाची जाणीव करून देत. याची तीव्रता मी अनुभवली जेव्हा मी मुंबईला होते, मम्माला फोन करून गाणं म्हणायला लाऊनच पहिला घास घ्यायचे. या गाण्यात एक जादू अशी होती की माझे पाय नेहमी माझ्या संस्कारांच्या मुळांशी घट्ट रोवले गेले. या गाण्याशी माझ बालपण जोडलेलं आहे अन माझ भविष्यही. माझ संपूर्ण आयुष्य या गाईच्या गोठयाभोवतीच फिरत राहणार हे नक्की!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment