(प्रिया, क्रिति आणि रीचा, एका भन्नाट अनुभवासाठी ठरवतात नामांकीत स्मशानभूमीला भेट द्यायची. जिथे बसेस बंद पडतात आणि मग कोणत्याही रूपातलं भूत बस मधून खाली उतरून निघून जात. तिघीही बसच्या दरवाज्याजवळ बसलेल्या असतात. प्रियाच्या बाजूस एक आजी बसलेली आहे. तिच्या मैत्रिणी पाठीमागच्या सीटवर बसलेल्या आहेत.)
प्रिया - यार, I'm so excited!
क्रिति - Me too यार, मजा आयेगा आज, हम तीनो को छोड के भी कोई भूत हो सकता है क्या?
(तिघींचा हश्या पिकतो)
रीचा - पागल हो क्या यार? प्रिया मला तर जाम भीती वाटतेय.
प्रिया - काय बे तू….शी!
कंडक्टर - तिकीट मडम?
प्रिया - तीन लास्ट स्टोप.
(कंडक्टर गूढ चेहऱ्याने तिकीट पंच करून देतो.)
(बाजूच्या सीटवरची बाई फारच घाबरी घुबरी होऊन घाम पुसत असते, तिचा नवरा तिचं सांत्वन करत असतो)
बाई - मला बाई जाम भीती वाटतेय! तुम्हांला काय हीच बस मिळाली का? जळल मेलं लक्षणं हे!
नवरा - गप्प ग! आहे ना मी सोबत, मग कशाला घाबरत आहेसं?
(बसच्या बेलचा आवाज टिंग टिंग. बस थांबते. बरेच प्रवासी उतरतात तर काही आत चढतात, काहीशे गंभीर चेहऱ्याने.)
कंडक्टर - (मोठया आवाजात) चला, बस दहा मिनिट थांबणार बघा इथ.
(दहा मिनिटाच्या ब्रेकनंतर काही नवे प्रवासी पुन्हा बस मध्ये चढतात, शेवटची बस असल्यामुळे, बस मध्ये थोडी गर्दी होते, प्रवाश्यांचा आपसांत कुजबुजण्याचा आवाज, कंडक्टर बेल वाजवतो टिंग टिंग अन बस सुटते. )
क्रिति- अबे, तुने देखा क्या?
प्रिया - क्या?
क्रिति - (जोरात ओरडतेच) पाँव. (सगळे क्रितिकडे पाहतात, तशी ती हळू आवाजात बोलते.) भूत के उल्टे पाँव?
प्रिया- नही बे, कितना ध्यान से देख रही हूँ, कुछ भी तो नहीं दिखा, लेकिन मुझे ना उस सफ़ेद साड़ीवाली औरत पे शक है!
(रीचा मागे वळून पाहू लागते)
प्रिया - मूर्ख…मागे नको पाहूस! Act normal.
(बसची बेल वाजते टिंग टिंग. प्रिया जवळ बसलेली आजी उतरू लागते)
आजी - जपून जावा हो पोरींनो! पुढ लय धोखा हाय!
(प्रियाचा चेहरा काळवंडतो, आजी उतरते. कंडक्टर सीट रिकामी झाल्यामुळे प्रियाच्या बाजूस बसतो.)
रीचा - यार, बघ ती आजी काय बोलली.
क्रिति - कमीनो! मुझे समझ में नहीं आया, वह कुछ ज्यादा ही अच्छी मराठी बोल रही थी ।
प्रिया - अरे यार, वह बोली कि आगे खतरा है, संभल के जाओ।
(प्रिया आणि रीचा क्रितिकडे पाहून हसतात.)
(प्रिया कंडक्टरकडे पाहून विचारते)
प्रिया- काका, स्मशानभूमीवर खरचं बस बंद पडते का हो?
(कंडक्टर चुपचाप नोटा मोजत राहतो.)
(अचानक जोरात आवाज येतो…खाडडड…बस थांबते. बाजूलाच स्मशानभूमीचा बोर्ड झळकत असतो. बस मध्ये चिडीचूप शांतता पसरते, उरतो तो फक्त श्वासांचा आवाज. कोणी एक बाई किंकाळी फोडते तर कोणाच्या तोंडून राम राम चा जप सुरु होतो. प्रिया झरकन मागे वळून पाहते. कोणीच उठतांना दिसत नाही. तिघी मैत्रिणी टक लाऊन त्या पांढऱ्या साडीवाल्या बाईकडे पाहत राहतात.)
(दरवाजा उघडतो किरकिर. हळूच कंडक्टर उठून उभा राहतो. उल्ट्या पायांनी तो स्मशानभूमीकडे चालू लागतो.)
(तितक्यात बाईकचा आवाज येतो, प्या प्या! हॉर्नचा आवाज, बाईक थांबते, अन बाईकच्या पाठीमागून कंडक्टर उतरतो.)
कंडक्टर - काय बे साल्या, चहा प्यायला गेलो अन तू बस पळवलास व्हयं रे बत्ताश्या!
(प्रिया, क्रिति, रीचा चिडीचूप बसलेल्या असतात.)
प्रिया सातपुते

No comments:
Post a Comment