मनाचे मनाशी चालू असणारे हितगुज मी इथे लिहित आहे. खूप दिवसांपासून मनात होत कि मनातल मनात नको ठेवायला. लहानपणापासून डायरी माझी जिवलग मैत्रीण-मित्र. मनातल कोणासमोर व्यक्त होण मला कधी जमलच नाही. या मुळे काही लोकांना मी घमेंडखोर, तर काहीना चक्क स्वार्थी पण वाटले. माझ्या मनातल्या विचारांच्या घोड्यांचा लगाम मी सोडून दिला आणि मग जन्माला आल,............"काही मनातले" © 2011 Priya Satpute All Rights Reserved
Sunday, 29 December 2013
Saturday, 28 December 2013
एक अंतिम पत्र
हाती वेळ नसणाऱ्या एका वेड्या मैत्रिणीच पत्र…
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रिया सातपुते
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या वेड्या मित्रा,
आयुष्यात चेहरा पाहून प्रेम करणारे खूप असतात, आयुष्यात रंग, रूप, पैसा, दर्जा पाहून प्रेम करणारे ही खूप असतात. मन, विचार पाहून प्रेम करणारे फारच थोडे असतात. आयुष्यात या तारेवरून जाताना कोणत्या तारेवरती पाय पडेल हे सांगण मात्र खूप कठीण होत एकेकांना! प्रत्येक वळणावर एक नवीन कसरत, एक नवीन तार असतेच.
आयुष्यात अचानक भेटले मी तुला आणि का कोणास ठाऊक, तुझे विचार मला तुझाकडे खेचत होते कि माझे मन? कधी वाटलं ही नव्हत कि कोणी माझ्यावर प्रेम करेल पण, ते तू केलस आणि बोलूनही स्पष्टपणे गेलास.
नेहमीच तुझ्या प्रश्नांना टाळतच राहीले, पण, तू मात्र विचारायचं सोडलं नाहीस. नाही म्हटल्यावरही तुझ्या प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. प्रथम आपण मित्र होतो हे मी कधीच विसरले नाही, तू मात्र मित्रापेक्षा जास्त बनण्याच्या प्रयत्नात होतास. जणू तू हार न मानण्याची शपथच घेतली होतीस. माझ्या प्रत्येक संकटात धावून येणारा तू माझा मित्र, मित्रच राहशील ही कल्पना तुला इतकी का दुखावते?
तुझ्यासारखा साथीदार मिळण हे भाग्यचं आहे पण, ते माझ्या नशिबी नाही. तुला सांगूही शकत नाही. काही गोष्टी न कळलेल्याच बऱ्या! तुझ्यासोबत जगायला खूप आवडेल मला पण, वेळ फार कमी आहे रे!
वेळ ही जणू माझ्यासाठी काळच आहे.
तुला हे पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी नसेनही पण, तू दुखी होऊ नकोसं, आयुष्य थोडीच थांबत कोणासाठी!
भेटू लवकरच, आता निघायला हवं. काळजी घे.
तुझी आणि फक्त तुझी
वेडी मैत्रीण…
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~प्रिया सातपुते
शायरी
कहते कहते हुए रुकना तो
तुम्हारी आदत बन गई है,
क्लासरूम में मुझे देखना तो
तुम्हारी जरुरत बन गई है।
प्रिया सातपुते
तुम्हारी आदत बन गई है,
क्लासरूम में मुझे देखना तो
तुम्हारी जरुरत बन गई है।
प्रिया सातपुते
शायरी
बिखरी हुई यादो की तरह
तुम सीने में दफन हो,
सवारी हुई यादो की तरह
तुम दिल में जिंदा हो।
प्रिया सातपुते
तुम सीने में दफन हो,
सवारी हुई यादो की तरह
तुम दिल में जिंदा हो।
प्रिया सातपुते
कबुतर
पंख फुगवलेल्या कबुतरास
बघून मी माझं पेन उघडलं
मान डोलावत त्यान माझं कुतूहल पाहिलं
डोळे मिचकावत छातीत फुगार घालून
ते ताठ उभं राहिलं
ओल्या झालेल्या पंखांना डुलवत
पावसाला चिडवून नाक मुरडत राहिलं
पिसात चोच खुपसून
जोडीदाराला भुलवत राहिलं
लाल रंगाच्या डोळ्यात
प्रणयाची लाट येताच
पंख पसरून आकाशात
जोडीदारामागे भिरकावलं…
प्रिया सातपुते
Tuesday, 24 December 2013
प्रियांश...१६
बऱ्याच दिवसांपासून मी लिहण टाळत होते, एकंदरीत एखादा विषय मनात घोळत राहतो अन त्याला मांडायला मन तयार होतंच असं नाही, एकेकदा वाटलं जे वाटत आहे ते लिहून टाकून मोकळ होऊया, पण का कोणास ठाऊक मनात एक अढ येत होती, फायनली त्या मनाला आज मोकळ्या हवेत श्वास घेताना जाणवलं कि, प्रत्येकाला त्याला हवं तसं जगण्याचा हक्क आहे! ती व्यक्ती कशीही का असेना, काळी-गोरी, कोणत्याही जाती धर्माची अथवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणारी असो, मग ते समलैंगिक असो वा नसो! जगण्याचा हक्कं प्रत्येकाला आहेचं.
काही लोकांना वाटत, "समलैंगिक" हा रोग आहे, तर काहीना ही नैतिकतेच्या बाहेरची गोष्ट वाटत आहे. तर काहींना असं काही अस्तित्वात असतं हेचं माहित नाहीय…आपण चार माणसांसोबत चार भिंतीच्या घरात राहतो, त्या चार भिंतीच्या पलीकडे समाज नावाच्या भल्यामोठ्या नियमावलीत जगतो, हे चूक, हे बरोबर हा पाढा आपण लहानपणापासूनच घोकत आलोय आणि तोच पाढा काहीजण आयुष्यभर घोकत राहतात. मग, जर तो पाढा चुकीचा का असेना तो घोकतच लहानाचे मोठे होतो, माणसाला माणूस म्हणून जगण्याच स्वातंत्र्य न देता त्याला घुसमटून टाकतो अन मारून देखील. जसं, एखाद्या चिमणीला मनुष्याने हात लावला म्हणून बाकीच्या चिमण्या तिला टोचून टोचून मारतात अगदी तसचं!
समलैंगिक असण हे नैतिकतेच्या बाहेर आहे असं म्हणून त्यांचा स्वच्छंदीपणे जगण्याचा अधिकार काढून घेण हि कोणती नैतिकता आहे? प्रत्येक मनुष्यामध्ये स्त्री आणि पुरुष ही दोन्ही तत्वे आढळतात. या तत्वांवर कोणाचीच पकड नसते, निसर्गतःच गुणधर्म बदलतात. याचा अर्थ असा धरला जावू नये कि हे धर्माच्या विरोधात आहे. हिंदू धर्मात भगवान "अय्यप्पाचा जन्म हरी-हरा अर्थात विष्णू-शिव मुळे झाला होता. हे विसरून चालणार नाही, अर्थात हिंदू धर्मात समलैंगिकतेला गुन्हा ठरवण्यात आलेलं नाही. एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक निवडीच्या आधारावर त्यांना हिणवण, भेदभाव करण हे सर्वस्वी चूक आहे.
समलैंगिक हा रोग नाही ना स्वैराचार! याच्यावर बऱ्याच मानसोपचार तज्ञांचे लेखं नजरेखालून गेले, मनात मात्र फक्त एकच विचार आला. समलैंगिक असण म्हणजे फक्त आणि फक्त शारीरिक सुखाशी जोडून भागणार नाही, हे त्याच्या पलीकडचे गणित आहे. रडणाऱ्या मुलाला दहा जणांनी गप्प करायचा प्रयत्न केला तरीही ते मुलं आईच्या हातात जाताच गप्पं होत. कारण, प्रेम! तसचं काही प्रत्येक माणसाच आहे, ज्याच्या सोबत सुरक्षित, प्रेम आणि जिव्हाळा मिळतो तिथेच माणूस चालला जातो. काहींना अपशब्दांनी हिणवलं जात, काहींसोबत वाईट भूतकाळ असतो, तर काहींना आकर्षण. मनाला जिथे विसावा मिळतो, ज्याच्यासोबत मिळतो तिथे ते स्थिरावत.
प्रिया सातपुते
Thursday, 12 December 2013
प्रियांश...१५
जगण कसं असावं? बेभान, स्वच्छंदी पक्ष्यासारख, वाटेल तेव्हा भरारी घ्यायची, मनात आलं कि बागडायचं, या क्षणात भरभरून जगून घ्यायचं… समोरच्याला चांगलं वाटेल म्हणून मनाला मुरड घालत जगतच आले अन जेव्हा स्वतःला चांगलं वाटेल असं जगायला शिकले तेव्हा नाके मुरडणारे कमी नव्हते…प्रत्येक माणसाच्या मनाला आवडेल असं आपण वागू शकत नाही…म्हणून आपण आपला विचार करावा…बाजूचा काय बोलतोय? पाठीमागून किती गाणी गात आहेत? हे सार दुय्यम आहे…स्वतःच्या मनाला, विचारांना जे पटेल तिथे दामटून बसावं अन आपल्या आयुष्याचा आपणच राजा वा राणी व्हावं…
प्रिया सातपुते
Sunday, 1 December 2013
प्रियांश...१४
शाळेचा ड्रेस का घालतात? हा प्रश्न मी लहान असताना खूपदा विचारला, त्यामागे शिस्तप्रियता हे एक कारण होतच पण, श्रीमंत घरची मुले रोज एक नवा ड्रेस घालून येतील आणि जी मध्यमवर्गीय मुले आहेत त्यांना वाटत राहील कि आमच्याकडे का अशे ड्रेस नाहीत, कोणत्याही मुलाने, कोणालाच हिणवू नये म्हणून काढण्यात आलेला हा तोडगा! पण, शाळा हे विसरून गेल्या कि मुलांच्या वाढदिवसाच्या नावाखाली आई वडील श्रीमंतीचं जे स्तोम शाळांमध्ये मांडतात ते कितपत योग्य आहे? चॉकलेट पर्यंत ठिक पण, पेस्ट्री, महागातले गिफ्ट्स देण कितपत योग्य आहे? लहान मुलं मातीचा गोळाच असतो, आपण त्याच्यासमोर जे बोलू, वागू तशेच ते घडतात. मागच्या आठवड्यात मैत्रिणीच्या भाच्याच्या बर्थडेला गेले होते, तिथे एका पाच वर्षाच्या मुलाचे कानावर पडलेले शब्द इथे मला सांगायचे आहेत, "मला रिटर्न गिफ्ट दिलं नाहीसं तू, शी तू किती घाणेरडा आहेस, रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं, माझ्या आईने सांगितलं आहे, बघ मी दोन दोन दिले आणि तू एक पण नाही." समोर उभ्या असलेल्या त्या आईचा चेहरा झपकन खाली पडला आणि त्या चिमुकल्याचा पण. त्या मुलाच्या आईच्या पुढ्यातच मी म्हणाले,"इतका छान केक, आयस्क्रीम खाल्ल तू, हो ना? त्याने तुला बर्थडेला प्रेमाने बोलवलं ना? प्रेमच नाही का सगळ्यात मोठ्ठं गिफ्ट तुझ्यासाठी? किती प्रेम करतो बघ तो तुझ्यावर! प्रेमच सगळ्यात मोठ्ठं गिफ्ट असतं! चल, सॉरी बोला शेक हंड करा!" किती सोप्पं असतं या चिमुकल्यांना समजावण पण, या मोठ्या लोकांना कधी कळणार प्रेमाची भाषा?
शाळेतलं स्तोम शाळाच बंद करू शकतात, प्लिज तुमच्या घरी कोणी लहान मुले असतील तर अश्या स्तोमाला बळी पडून लहान मुलांमध्ये भेदभावाला खतपाणी घालू नका. उलटा प्रिन्सिपलना सांगून हे सगळ बंद करायला सांगा. आपल्या मुलांना प्रेमाचं गिफ्ट द्यायला शिकवा ना कि भेदभावाच!
प्रिया सातपुते