शाळेचा ड्रेस का घालतात? हा प्रश्न मी लहान असताना खूपदा विचारला, त्यामागे शिस्तप्रियता हे एक कारण होतच पण, श्रीमंत घरची मुले रोज एक नवा ड्रेस घालून येतील आणि जी मध्यमवर्गीय मुले आहेत त्यांना वाटत राहील कि आमच्याकडे का अशे ड्रेस नाहीत, कोणत्याही मुलाने, कोणालाच हिणवू नये म्हणून काढण्यात आलेला हा तोडगा! पण, शाळा हे विसरून गेल्या कि मुलांच्या वाढदिवसाच्या नावाखाली आई वडील श्रीमंतीचं जे स्तोम शाळांमध्ये मांडतात ते कितपत योग्य आहे? चॉकलेट पर्यंत ठिक पण, पेस्ट्री, महागातले गिफ्ट्स देण कितपत योग्य आहे? लहान मुलं मातीचा गोळाच असतो, आपण त्याच्यासमोर जे बोलू, वागू तशेच ते घडतात. मागच्या आठवड्यात मैत्रिणीच्या भाच्याच्या बर्थडेला गेले होते, तिथे एका पाच वर्षाच्या मुलाचे कानावर पडलेले शब्द इथे मला सांगायचे आहेत, "मला रिटर्न गिफ्ट दिलं नाहीसं तू, शी तू किती घाणेरडा आहेस, रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं, माझ्या आईने सांगितलं आहे, बघ मी दोन दोन दिले आणि तू एक पण नाही." समोर उभ्या असलेल्या त्या आईचा चेहरा झपकन खाली पडला आणि त्या चिमुकल्याचा पण. त्या मुलाच्या आईच्या पुढ्यातच मी म्हणाले,"इतका छान केक, आयस्क्रीम खाल्ल तू, हो ना? त्याने तुला बर्थडेला प्रेमाने बोलवलं ना? प्रेमच नाही का सगळ्यात मोठ्ठं गिफ्ट तुझ्यासाठी? किती प्रेम करतो बघ तो तुझ्यावर! प्रेमच सगळ्यात मोठ्ठं गिफ्ट असतं! चल, सॉरी बोला शेक हंड करा!" किती सोप्पं असतं या चिमुकल्यांना समजावण पण, या मोठ्या लोकांना कधी कळणार प्रेमाची भाषा?
शाळेतलं स्तोम शाळाच बंद करू शकतात, प्लिज तुमच्या घरी कोणी लहान मुले असतील तर अश्या स्तोमाला बळी पडून लहान मुलांमध्ये भेदभावाला खतपाणी घालू नका. उलटा प्रिन्सिपलना सांगून हे सगळ बंद करायला सांगा. आपल्या मुलांना प्रेमाचं गिफ्ट द्यायला शिकवा ना कि भेदभावाच!
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment