पंख फुगवलेल्या कबुतरास
बघून मी माझं पेन उघडलं
मान डोलावत त्यान माझं कुतूहल पाहिलं
डोळे मिचकावत छातीत फुगार घालून
ते ताठ उभं राहिलं
ओल्या झालेल्या पंखांना डुलवत
पावसाला चिडवून नाक मुरडत राहिलं
पिसात चोच खुपसून
जोडीदाराला भुलवत राहिलं
लाल रंगाच्या डोळ्यात
प्रणयाची लाट येताच
पंख पसरून आकाशात
जोडीदारामागे भिरकावलं…
प्रिया सातपुते
No comments:
Post a Comment